WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात? 3000 रुपये एकत्र येणार की 1500? मोठी अपडेट आली!|Ladki Bahin Yojana Big Update

Ladki Bahin Yojana Big Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिना संपायला आता अवघे शेवटचे दोन दिवस उरले आहेत, तरीही लाडकी बहीण योजनेचा १७ वा हप्ता (नोव्हेंबरचा हप्ता) अजूनही खात्यात जमा झालेला नाही. यामुळे अनेक भगिनींच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, “जीआर (GR) आला आहे का? पैसे नक्की कधी येणार?” याबाबत आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाने हप्ता वितरणाची तयारी सुरू केली असून, पैसे नक्की कधी मिळणार आणि नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे एकत्र मिळणार का? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण खालील लेखात पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana Big Update: नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रोसेस सुरू!

लाडक्या बहिणींसाठी एक Big Update समोर येत आहे. ती म्हणजे, सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तयारी सुरू केली आहे.

जेव्हा कधी हप्ता वितरीत करायचा असतो, तेव्हा महिला व बालविकास विभाग पात्र महिलांची यादी तयार करतो आणि त्याप्रमाणे सरकारकडे निधीची (Funds) मागणी करतो. मिळालेल्या माहितीनुसार, विभागाने नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारकडे मागवला आहे. याचा अर्थ, पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील.

3000 रुपये (नोव्हेंबर + डिसेंबर) एकत्र मिळणार का?

सध्या राज्यात नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की, सरकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकदम जमा करेल.

मात्र, सत्य परिस्थिती काय आहे? सध्या सरकारने केवळ नोव्हेंबर महिन्याच्या १५०० रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. डिसेंबर महिन्याच्या निधीबाबत किंवा तो लवकर देण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा हालचाल झालेली नाही. त्यामुळे ३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता कमी असून, सध्या तरी फक्त नोव्हेंबरचे १५०० रुपयेच जमा होतील, असे चित्र आहे.

Leave a Comment