Ladki Bahin Yojana E-KYC Update: लाडक्या बहिणींनो, E-KYC करण्यासाठी केंद्रावर गर्दी करू नका आणि घाबरूनही जाऊ नका. सरकारने घेतला मोठा निर्णय! नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दलही महत्वाची स्पष्टता.
राज्यातील लाखो महिला ज्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी (Good News) समोर आली आहे. अनेक महिलांची अद्याप ई-केवायसी (E-KYC) पूर्ण झालेली नाही, त्यामुळे “योजना बंद पडेल का?” किंवा “पुढचा हप्ता मिळेल का?” अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, आता महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Ladki Bahin Yojana E-KYC साठी मिळाली मोठी मुदतवाढ!
तुम्ही अद्याप E-KYC केली नसेल, तर चिंता करण्याची गरज नाही. कारण, E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सकाळी आलेल्या अपडेटनुसार, ही मुदतवाढ मोठी असणार हे सांगितले होते आणि त्यानुसारच शासनाने महिलांना हा मोठा दिलासा दिला आहे.
ई-केवायसी नाही झाली, तरी नोव्हेंबरचे पैसे मिळणार?
ज्या महिलांची E-KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार की नाही? तर याचे उत्तर ‘हो’ असे आहे. ज्यांची केवायसी बाकी आहे, अशा महिलांच्या खात्यातही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता, ३१ डिसेंबरच्या आत सावकाश आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी वेबसाईवर नवीन पर्याय
अनेक महिला अशा आहेत ज्यांच्याकडे पतीचे किंवा वडिलांचे कागदपत्र उपलब्ध नाहीत (उदा. विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला). अशा महिलांना E-KYC करताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता अधिकृत वेबसाईटवर नवीन पर्याय (New Option) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी वेगळी सुविधा.
घटस्फोटित महिलांसाठी सुलभ प्रक्रिया. (याबाबत वेबसाईट सुरळीत चालल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल).
हे काम आधी करा! (Important Step)
मुदतवाढ मिळाली असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-केवायसी करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे आता पुरेसा वेळ आहे, त्यामुळे जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधी मोबाईल नंबर लिंक करून घ्या, जेणेकरून ओटीपी (OTP) येण्यास अडचण येणार नाही.
Disclaimer:
सदर माहिती उपलब्ध अपडेट्स आणि मंत्र्यांच्या सोशल मीडिया माहितीवर आधारित आहे. अधिकृत बदलांसाठी शासनाच्या जीआर (GR) किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.









