WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरपासून मिळणार 2100 रुपयांचा लाभ|Ladki bahin yojana 2100

Ladki bahin yojana 2100:महाराष्ट्रात लागू झालेल्या माझी लाडकी बहीण योजनेने मोठं यश मिळवलं. या योजनेमुळे हजारो महिलांच्या खात्यात दरमहा आर्थिक मदत जमा झाली आणि त्याचा थेट फायदा सरकारला निवडणुकीत मिळाल्याचं बोललं जातं. हाच पायंडा पाहून आता दुसऱ्या राज्यातही अशीच योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

महिलांसाठी आर्थिक आधार

या नव्या योजनेत महिलांना दरमहा ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. विवाहित तसेच अविवाहित अशा सर्व महिलांसाठी हा लाभ खुला असणार आहे. त्यामुळे घरगुती खर्च भागवणं किंवा छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करणं महिलांसाठी सोपं होणार आहे.

कोण मिळवणार पहिल्यांदा फायदा?

सुरुवातीला कमी उत्पन्न गटातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेत सामावून घेतलं जाईल. त्यानंतर इतर गटातील महिलांनाही टप्प्याटप्प्याने समाविष्ट केलं जाणार आहे.

पात्रता निकष काय असतील?

  • महिला संबंधित राज्याची किमान 15 वर्षांपासून रहिवासी असावी.
  • विवाहित महिलांच्या बाबतीत पतीदेखील 15 वर्षांपासून स्थायिक असणे बंधनकारक आहे.
  • एका कुटुंबातील कितीही महिलांनी अर्ज करता येणार आहे.

उलगडा झाला अखेर!

या योजनेची घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केली आहे. 25 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या या योजनेला दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजना असे नाव देण्यात आले आहे. आणि योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 2100 रुपये खात्यात जमा होणार आहेत.

Leave a Comment