रक्षाबंधनच्या अगोदर या दिवशी खात्यात येणार लाडकी बहीण योजनेचे ₹1500 Ladki Bahin Yojana 13th Installment: मोठ्या उत्साहाने सुरू असलेला माझी लाडकी बहीण योजनेच्या तेराव्या मासिक हप्त्याचे वाटप लवकरच सुरू होणार आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 2.41 कोटी महिलांना या योजनेतून लाभ दर महिन्याला दिला जातो यात महिलांना ₹1500 थेट त्यांच्या खात्यात जमा होतात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे जेणेकरून रक्षाबंधन पूर्वी बहिणींना या हप्त्याचा लाभ मिळेल.
योजनेची स्थिती आणि महिलांचे मत
याआधी लाडकी बहीण योजनेचे 12 हप्ते वितरित झालेले आहेत बारा वाहता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या सुरुवातीला मिळाला होता आता लवकरच लाडक्या बहिणींना तेरावा हप्ताही मिळणार आहे या योजनेमुळे लाडक्या बहिणींना खूप फायदा होते उदाहरणार्थ नाशिक मधील काही महिला म्हणतात की त्यांच्या घरातील खर्चासाठी त्या यापूर्वी त्यांच्या पती किंवा मुलांवर अवलंबून होत्या पण आता स्वतः त्यांना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्याचा त्यांना खूप फायदा मिळतो
पात्रता अटी
- महाराष्ट्रातील मूळ रहिवासी महिला.
- वय: 21–65 वर्ष.
- वार्षिक कुटुंब उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबात सार्वजनिक नोकरदार किंवा आयकरदाता नसावा.
- चार चाकी वाहनस्थीती नसावी (कृषी ट्रॅक्टर वगळता).
- महिला स्वतःच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक, संयुक्त खाते मान्य नाही.
- खाते आधार-लिंक आणि SMS अलर्ट सक्षम असणे आवश्यक, अन्यथा DBT प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो Default Site
वितरणाची पारदर्शी DBT प्रक्रिया
योजनेंतर्गत सर्व आर्थिक मदतीचे थेट स्थानांतरण DBT माध्यमातून होते, ज्यामुळे कमी भ्रष्टाचार व त्वरित निधी मिळतो. प्रत्येक व्यवहारासाठी SMS अधिसूचना पाठविली जाते







