2000 bhaubeej beth: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांना भाऊबीज भेट म्हणून ₹2000 देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सर्व महिलांना ही भाऊबीज गिफ्ट भेटणार नाही. कोणत्या महिला आहेत ज्यांना भाऊबीज गिफ्ट भेटणार आहे. चला आपण पाहू.
'लाडकी बहीण' योजनेच्या दिवाळी भेटीवर शासनाचे मौन
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत मिळते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर, दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारकडून काही विशेष बोनस किंवा भाऊबीज भेट मिळेल, अशी मोठी अपेक्षा लाभार्थी महिलांमध्ये होती. ₹2000 ची भेट मिळण्याच्या शक्यतेबद्दल चर्चा सुरू होत्या.
परंतु, आजपर्यंत राज्य सरकारकडून 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कोणत्याही अतिरिक्त दिवाळी बोनसची किंवा विशेष भाऊबीज भेटीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे, या योजनेअंतर्गत महिलांना केवळ त्यांचा नियमित मासिक हप्ताच मिळेल, स्वतंत्र दिवाळी भेट मिळण्याची शक्यता सध्या तरी नाही. दिवाळीच्या काळात ऑक्टोबर महिन्याचा नियमित हप्ता जमा होऊ शकतो, मात्र ती रक्कम भाऊबीज भेट नसेल, असे स्पष्ट होत आहे.
अंगणवाडी सेविकांना निश्चित दिवाळी भेट
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून ₹2000 ची भाऊबीज भेट दिली जाईल. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सुमारे ४०.६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी थेट संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, ₹2000 ची भाऊबीज भेट ही केवळ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी निश्चित करण्यात आली आहे. 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अशा कोणत्याही भेटीची घोषणा सरकारने केलेली नाही.







